20/06/2022 17:00:51 PM Sweta Mitra 1
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावरून मालवाहू गाड्या विजेवर सुरू आहेत. या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २० जूनला बंगळुरू येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यानिमित्त मडगावसह रत्नागिरी व उडपी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील सुमारे ७४० किलोमीटर अंतराचे महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या गोव्यासह तीन राज्यांत असलेल्या कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावर उडपी, मडगाव आणि रत्नागिरी या स्थानकांवरील कार्यक्रमावेळी विजेवरील रेल्वे गाड्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे राष्ट्रार्पण होणार आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १,२८७ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.