थालापती विजय बर्थडे स्पेशल


22/06/2022 18:43:15 PM   Sweta Mitra         8


आज अभिनेता  विजय थालापती  48 वा वाढदिवस आहेत. विजयचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला वाढदविसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयनं अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे वडील हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. अभिनेता विजयचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. बालकलाकार म्हणून विजयनं चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नालया थीरपू'  या चित्रपटामध्ये पहिल्यांदा लीड अभिनेता म्हणून त्यानं काम केलं. तेव्हा विजय 18 वर्षाचा होता. संगीता आणि विजयची लव्ह स्टोरी ही फिल्मी आहे. विजय त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग चेन्नई येथील फिल्मसिटीमध्ये करत होता. शूटिंगमध्ये ब्रेक मिळाल्यानंतर विजयला भेटायला संगीता गेली. विजय आणि संगीता यांच्यामध्ये मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विजयनं  25 ऑगस्ट 1999 रोजी संगीतासोबत लग्नगाठ बांधली.  संगीता ही यूकेमध्ये रहात होती. ती विजयची फॅन होती. संगीता ही श्रीलंकेच्या उद्योगपतींची मुलगी आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actor south actor kollywood thalapati vijay birthday borthday celebration