22/06/2022 18:46:28 PM Sweta Mitra 2
विधान परिषद निवडणूक संपल्यावर बाळासाहेबांनी आपल्याला जेवायला बोलवले आहे, असं सांगून आमदार कैलास पाटील यांना एका खास खाजगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले. ठाण्यापासून सुमारे 40 किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे हे कैलास पाटील यांच्या लक्षात आले. मात्र जसंही ही आपली दिशाभूल केली गेली असं त्यांना कळालं त्या क्षणी त्यांनी एकनाथ शिंदेच्या हातावर तुरी देत त्यांना हुलकावणी दिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेले याचा पहिला प्रसंग समोर आला आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले होते. मात्र शिंदेचा मनसुबा आणि त्यांचा डाव कळताच कैलास पाटील मोठ्या शिताफीने त्यांच्या तावडीतून निसटले. त्यांनी तिथून थेट मातोश्री गाठली आणि आपल्या सोबत घडलेला सगळा प्रसंग शिवसेना पक्ष नेतृत्वासमोर कथन केला.