23/06/2022 17:46:54 PM Sweta Mitra 1
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिंदेंनीही जशास तशी भूमिका घेतली आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदावरून सुनील प्रभूंना यांना हटवून त्यांच्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याचं शिंदे यांनी घोषित केलं आहे. तसंच शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती अवैध असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. शिंदेंनी विधानसभा उपाध्यक्षांना 34 आमदारांच्या स्वाक्षरीनिशी पत्र लिहून आपणच शिवसेनेचे गटनेते असल्याचं स्पष्ट केलं आहे.