23/06/2022 17:48:37 PM Sweta Mitra 1
एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. 42 शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याची माहिती समोर आली आहे