देवदर्शनावरून परतताना अपघात


23/06/2022 17:51:00 PM   Sweta Mitra         1


उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. गजरौला पोलीस ठाण्याच्या पुरणपूर महामार्गावर भरधाव वेगात आलेले पिकअप वाहन झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. चालकाने डुलकी घेतल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालामुद येथील घटना असून, हरिद्वारहून स्नान करून परतणाऱ्या १७ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप अनियंत्रितपणे झाडावर आदळली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. इतर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              up uttarpradesh dead accident road accident many dead haridwar