23/06/2022 17:52:24 PM Sweta Mitra 1
लग्नातील अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. भरमंडपात नवरदेवाची मेहुणीने धुलाई केली आहे. नवरदेवाने नवरीच्या बहिणीसोबत लग्नात असं काही केलं की त्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने त्याला चांगलीच अद्दल घडवली.
व्हायरल व्हिडिओमध्ये नवरा, नवरी आणि नवरीची बहिण स्टेजवर आहेत. नवरदेव दारूच्या नशेत दिसत असून तो मद्यधुंद अवस्थेत नवरीऐवजी नशेत मेहुणीच्याच गळ्यात वरमाला घालतो. त्यानंतर मेहुणीच्या रागाचा पारा चढतो. रागात ती नवरदेवाच्या कानशिलात लगावते. त्यानंतर ही चांगली धुलाई करते. हे पाहून नवरी घाबरते, ती तिला मारण्यापासून अडवते. मग नवरदेव तिच्या गळ्यात टाकलेली वरमाला पुन्हा काढतो आणि नवरीच्या गळ्यात टाकतो.