23/06/2022 17:54:49 PM Sweta Mitra 1
शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दादर-माहिम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांचा गद्दार असा उल्लेख करत शिवसैनिकांनी त्यांच्या बॅनरला काळं फासलं. शिवसेनेची माहिममधील शाखा क्रमांक 188 बाहेर मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या फोटोला काळं फासून गद्दार असा उल्लेख केला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सात आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत.