25/06/2022 18:49:53 PM Sweta Mitra 92
मुंबईत झालेल्या 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरला पाकिस्तानने अटक केली आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने साजिद मीरला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात देण्यात आली आहे.
साजिद मीर हा एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतला महत्वाचा दहशतवादी आहे. पाकिस्तानने वारंवार साजिद मीर पाकिस्तानात नसल्याचे सांगितले होते. त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकिस्तान सरकारने केला होता. दरम्यान साजिदला ताब्यात घेऊन पाकिस्तानला दहशतवादाचा डाग पुसायचा आहे, असे बोलले जात आहे.