08/07/2022 18:30:02 PM Sweta Mitra 33
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा आज वाढदिवस. सौरव यांचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कोलकाता येथे झाला. सन 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करणाऱ्या सौरव गांगुली यांनी 113 कसोटी मालिकेत 17 वेळा नाबाद राहून 7212 धावा केल्या. त्यात एक दुहेरी शतक, 16 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 311 वनडे सामन्यात सौरव यांनी 22 शतके आणि 72 अर्धशतके ठोकली. एकून 11363 धावा केल्या. यासोबतच सौरव गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 132 विकेट देखील घेतले आहेत. सौरव गांगुली यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ सन 1999 ते 2005 दरम्यान 146 वनडे सामने खेळला. त्यापैकी 76 सामन्यामध्ये विजय मिळवला तर 65 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सौरव गांगुली यांना 1997 मध्ये अर्जुन अवॉर्ड तर 2004 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.