शिवाजी महाराज म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, यावर अनेकदा चर्चा झाली. पण औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिका प्रशासनानेच नागरिकांना सांगितल आहे, नुसतं शिवाजी चौक म्हणायचं नाही; तर छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणायचं. या आशयाचे होर्डिंग्जस गंगापूर शहरात लागल्यानं पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी हे राष्ट्राचे महापुरुष आहेत जनमनात यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे.