डेंग्यू तापाचा धोका टाळण्यासाठी जाणून घ्या यापासून बचावासाठी काय करावे?


19/07/2022 16:48:45 PM   Sweta Mitra         15
त्यासाठी पावसाळ्यामध्ये डासांपासून होणाऱ्या डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी उपाय करत राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जातो. चला जाणून घेऊया डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, 
डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप असतो. डेंग्यू हा मच्छर चावल्याने होतो. डेंग्यूचा प्रसार करणा-या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव एडीज एजिप्टी असे आहे. सामान्य भाषेत या मच्छरांना टायगर मच्छर असंही म्हटलं जातं. डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूचा मच्छर चावलेल्या रुग्णाला अचानकच खूप ताप येतो आणि भरपूर थंडी वाजून येते. रुग्णाचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखू लागतं. तसेच सांध्यामध्ये होणा-या वेदना आणि कमकूवतपणा सहन न झाल्याने अस्वस्थता येते. घशात कायम दुखणं सुरु असतं. आरोग्य तज्ञांच्या मते डेंगू टाळण्यासाठी डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी घराभोवती डासाची उत्पत्ती होऊ देऊ नये यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी. रिकाम्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका आणि रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              dengue dengur mosquito mosquito bite cure