21/07/2022 17:51:40 PM Sweta Mitra 8
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विजय आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लायगर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.सिनेमाच्या ट्रेलरमधील विजयच्या ॲक्शननं आणि अनन्या पांडेच्या ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचं लक्ष वेधले आहे. विजयची 'फायटर' स्टाइल चाहत्यांना आवडल्याचं दिसत आहे. ट्रेलर लाँच झाल्यानंतर काहीच वेळात व्हायरल झाला आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये विजयचा एक खास अंदाज बघायला मिळतो. या सिनेमात तो बॉक्सरची भूमिका साकारत आहे. करण जोहनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'लायगर' सिनेमा हा सिनेमा हिंदीसह चार दाक्षिणात्य भाषांमध्येही २५ ऑगस्टलाच रिलीज होणार आहे.