पुजारीचे शानदार द्विशतक


21/07/2022 17:55:43 PM   Sweta Mitra         26


भारताचा स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. ससेक्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या पुजाराने बुधवारी द्विशतक झळकावले. काउंटी चॅम्पियनशिपच्या या सत्रात पुजाराने झळकावलेले हे तिसरे द्विशतक ठरले असून तो एक विक्रम ठरला आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर मिडिलसेक्स विरुद्ध ससेक्स यांच्या लढत सुरू आहे. या सामन्यात पुजाराकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुजाराने द्विशतक पूर्ण केले. पुजाराने ४०३ चेंडूत २१ चौकार आणि ३ षटकारांसह २३१ धावा केल्या. मिडिलसेक्सकडून पाच विकेट घेणाऱ्या टॉम हेल्मने पुजाराची विकेट घेतली. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर द्विशतक करणारा पुजारा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या मैदानावर कोणत्याही स्तरावर आजवर एकाही भारतीय खेळाडूला द्विशतक करता आले नव्हते. काउंटी क्रिकेटच्या या हंगामात त्याने ७ सामन्यात ९५० धावा केल्या आहेत.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              cheteswarpujara match cricket indian cricket history