21/07/2022 17:57:43 PM Sweta Mitra 25
सध्याच्या जीवनशैलीमध्ये जंकफूड हे जवळ जवळ सर्वांनीच आपल्या खाद्यपदार्थांमधील एक भाग बनवला आहे. जंकफूड हे चविष्ट तसेच झटपट तयार होऊन मिळते व लगेच भूक भागून जाते म्हणूनच जंकफूडला पोषक आहारापेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. पण जंकफूडचे सेवन केल्याने खूप साऱ्या आजारांना सामोरे जाऊ शकते. तर जाणून घेऊयात जंकफूड चे सेवन केल्यामुळे कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
जंकफूड मुळे पचनशक्ती मंदावते
फास्ट फूड चे सेवन करत असल्यामुळे अपचन सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मानसिक आरोग्य कमी होते
जर तुमचे जंकफूड खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर यामुळे तुमचे मानसिक आरोग्य आपोआप कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला पुढे ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो.
हृदयविकाराच्या समस्या होऊ शकतात
जंकफूड तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चा स्तर वाढवतात आणि त्यामुळे हृदयासंबंधीचे रोग वाढण्याची शक्यता उद्भवते. कोलेस्ट्रॉल चा स्तर वाढल्यामुळे शरीराचे वजन देखील हळू हळू वाढू लागते आणि यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती सुद्धा वाढते.