युजवेंद्र चहल वाढदिवस


23/07/2022 19:35:55 PM   Sweta Mitra         14


भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 32 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हरियाणातील जींद या गावातून आलेल्या चहलने भारतीय संघात फिरकीपटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अडचणीच्या काळात कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्याकडे मदतीला धावला आहे आणि त्याने मोक्याच्याक्षणी विकेट मिळवत संघाला मदत केली आहे. चहल हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने क्रिकेट व बुद्धिबळ या दोन्ही खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याने 12 वर्षाखालील नॅशनल किड्स चेस चॅम्पियनशिप देखील जिंकली आणि त्याव्यतिरिक्त तो 16 वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेतही सहभागी झाला आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              yujvendra chahal cricket indian cricket birthday team india bcci icc indian sports odi t20