नीरज चोप्राची रौप्यभरारी


24/07/2022 19:44:53 PM   Sweta Mitra         16ऑलिम्पिक 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथेलिटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये इतिहास घडवला. नीरज चोप्राने रविवारी झालेल्या अंतिम फेरीत ८८.१३ मीटर दूर भाला फिरकावत रौप्य पदक पटकावलं.
ऑलिम्पिकमध्ये भारताला सुर्वण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आणखी एक मोठी कामगिरी केली. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत पदकावर नाव कोरलं. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक खेळात रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू ठरला. अमेरिकेतील युजीन मध्ये झालेल्या चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रासह एकूण १२ खेळाडू होते. नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोड्या फरकाने हुकलं. ९० मीटर भालाफेक करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसनने सुर्वण पदक पटकावलं. भारताचा रोहित यादव १०व्या स्थानी राहिला.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              silver neeraj chopra athlete javlin sports news silver medel championship javline throw tokyoolympic