क्रिती सेनाॅनचा आज वाढदिवस


27/07/2022 18:10:05 PM   Sweta Mitra         14


बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री  क्रिती सेनन आज (27 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तिने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. 
क्रिती सेननने आपलं करिअर यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अभिनयासोबतच क्रितीने मॉडेलिंग देखील केले आहे. मॉडेलिंग दरम्यान पहिल्या रॅम्प वॉकच्या वेळी आपण रडल्याचं, क्रिती सेननने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं. पहिल्या रॅम्प वॉकमध्ये तिच्याकडून काही चूक झाली होती, त्यानंतर तिला आणि सोबतच्या 20 मॉडेल्सना कोरिओग्राफरने चांगलेच फटकारले होते. यामुळे क्रिती घाबरली आणि रडू लागली होती. यावेळी तिच्या आईनेच तिची समजूत काढली होती.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              kriti sanon birthday actress bollywood actress birthday special