अर्पिता मुखर्जींकडे कोट्यावधींचा घबाड


28/07/2022 18:55:54 PM   Sweta Mitra         20


पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये ममता बनर्जी यांच्या उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्ती  अर्पिता  मुखर्जी यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्या घरातून ईडीनं 29 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोनं जप्त केलं आहे.
दरम्यान, अर्पिता मुखर्जी यांच्यावर ईडीची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी  अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तब्बल 21 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा 29 कोटींची रोकड आणि 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. नोटांची ही रोकड पाहून हे घर आहे बँकेचा लॉकर असा प्रश्न पडत आहे.  एवढे पैसे मोजण्यासाठी अधिकारीही कमी पडू लागले. त्यामुळं पैसे मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवावं लागलं. तसेच नोटांनी भरलेल्या बॅगा नेण्यासाठी ईडीला मोठा ट्रक देखील बोलवावा लागला. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. हा घोटाळा 50 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              arpitamukherjee actress moneylaunderingcase westbengal parthachatterjee tmc