'टाइमपास 3' चित्रपट रिव्ह्यू


30/07/2022 18:49:39 PM   Sweta Mitra         19


'टाईमपास 3' चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तब्बल चार वर्षांनी दगडूच्या आयुष्यातून प्राजू निघून गेल्यानंतर घडतो तो म्हणजे 'टाईमपास 3.' दगडूच्या आयुष्यातून प्राजु निघून गेल्यानंतर कॉलेजमध्ये त्याची झालेले एन्ट्री आणि तिथे त्याच्या आयुष्यात एन्ट्री होते ती पालवीची (ह्ता दुर्गुळे). पण ही लव स्टोरी दगडूच्या आधीच्या लव स्टोरी सारखी अजिबात नाही. सिनेमात कलाकारांनी आपली काम एकदम उत्तम केल्यामुळे कथेत असलेल्या त्रुटी दुर्लक्ष करता येतात. ह्ताने कम्फर्ट झोनच्या बाहेरची भूमिका केली आहे. 'बोले तो भिडू एकदम कडक' सोबत प्रथमेश पुन्हा एकदा दगडू म्हणून आपल्याला आवडला. या दोघांना संजय नार्वेकर, वैभव मांगले, भाऊ कदम आणि इतर कलाकारांची उत्तम सोबत लाभली आहे. असं असलं तरीही तरी पहिल्या भागाची मज्जा आणि दुसऱ्या भागात असलेली गंमत कुठेतरी या तिसऱ्या भागात हवी तेवढी मिळत नाही.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              timepass timepass3 review movie review Dagdu Third installment Palavi