31/07/2022 17:47:26 PM Sweta Mitra 6
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. आपण शिवसेना सोडणार नाही, असे ट्वीट संजय राऊत यांनी केली आहे. खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून मरेन पण शरण जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले. त्यानंतर तासाभरानंतर संजय राऊत यांनी तीन ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.