अभिनंदन मीराबाई चानू


31/07/2022 17:49:50 PM   Sweta Mitra         13


भारताची स्टार वेटफिल्टर मीराबाई चानू हिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याने तिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यावेळी 27 वर्षीय चानूने बर्मिंगहॅममधील तिचा ऑलिम्पिक विक्रमही सुधारला. तिने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. चानूच्या या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे अभिनंदन केले आहे. पीएमनरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे की, 'असामान्य मीराबाई चानूचा भारताला पुन्हा एकदा अभिमान आहे. बर्मिंगहॅम गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. तिने नवीन राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. तिचे यश अनेक भारतीयांना, विशेषतः नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी आहे.'


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              gold weightlifting mirabai chanu sprinter olympicgames indian gc