भरपावसात रस्त्यावरच प्रसूती


31/07/2022 17:51:51 PM   Sweta Mitra         4


जालन्यात एका महिलेने रस्त्यावर भरपावसात प्रसूती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ही घटना घडली. या रस्त्यावर जन्म दिलेल्या आईचे नाव रुपाली हरे आहे. 
असं म्हणतात की बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. हा काळ गर्भवती महिलेसाठी खूप कठीण आणि धोकादायक देखील असू शकतो. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी मुलाला जन्म देणं खूप गरजेचं आहे. मात्र, जालन्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महिलेने भर पावसात रस्त्यावर बाळाला जन्म दिला. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. ही घटना समाजातील भीषण वास्तव बोलकी आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              pregnent pregnent women gave birth auto viral video