31/07/2022 17:53:05 PM Sweta Mitra 21
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आज ३१ जुलै रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९२ साली मुंबईत जन्मलेली कियारा आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. तिने आपल्या अभिनयासोबतच आपल्या मनमोहक हास्याने सगळ्यांना वेड लावलं. कियाराने आपल्या बॉलिवूड करियरमध्ये अनेक चांगले चित्रपट देऊन प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र कियाराने बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. एकीकडे कियाराच्या खात्यात 'मशीन', 'इंदू की जवानी', 'फगली' सारखे फ्लॉप चित्रपट आहेत, तर दुसरीकडे 'कबीर सिंह', 'गुड न्यूज', 'भूल भुलैया २', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'शेरशाह' सारखे सुपरहिट चित्रपट आहेत.