देशात मंकीपॉक्सचा पहिला मृत्यू


02/08/2022 18:44:57 PM   Sweta Mitra         11


भारतात शिरकाव केलेल्या मंकीपॉक्सने आता पहिला बळी घेतला आहे. 22 वर्षांच्या तरुणाचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या केरळमध्ये देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला त्याच केरळात मंकीपॉक्समुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सची धास्ती निर्माण झाली आहे.
मंकीपॉक्समुळे मृत्यू होणारा हा तरुण 22 जुलैला यूएईहून भारतात आला होता. त्यानंतर त्याच्या मंकीपॉक्ससारखी लक्षणं दिसून आली होती. 27 जुलैला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 30 जुलैला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याचा अर्थ या तरुणाला मंकीपॉक्स होतो आणि मंकीपॉक्स व्हायरसमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं ट्विट एएनआयने केलं आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              virus monkey pox monkeypox virus dead india covid covid 19