LIC मध्ये नोकरीची संधी


05/08/2022 13:54:09 PM   Sweta Mitra         1


तुम्ही पदवीधर असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पदवीधर उमेदवारांना जीवन विमा निगममध्ये (LIC) नोकरीची संधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात. LIC च्या या भरती अंतर्गत 80 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 04 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी lichousing.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे. त्यामुळे उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा. या भरती अंतर्गत एकूण 80 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येईल. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              graduate job jobseeker LIC Graduate candidates Life Insurance Corporation recruitment website