05/08/2022 14:01:18 PM Sweta Mitra 107
सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये, ऑनलाइन व्यवहार आणि एटीएममधून पैसे काढणे पूर्णपणे सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत एटीएममधून पैसे काढताना येथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपलं खातं सुरक्षित ठेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
आजकाल एटीएम कार्ड क्लोनिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर, एटीएम वापरल्यानंतर, तुम्ही ते काळजीपूर्वक तपासले पाहिजे.
पैसे काढण्यापूर्वी अशा प्रकारे एटीएम चेक करा :
* तुम्ही एटीएममध्ये गेल्यास प्रथम एटीएम मशीनचा कार्ड स्लॉट तपासावा.
* एटीएम कार्ड स्लॉटमध्ये काही छेडछाड झाली असल्यास किंवा स्लॉट सैल असल्यास, ते वापरू नका.
* कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्यात जळणाऱ्या 'ग्रीन लाइट'वर लक्ष ठेवा.
* जर इथल्या स्लॉटमध्ये हिरवा दिवा असेल तर तुमचे एटीएम सुरक्षित आहे.
* त्यात लाल किंवा इतर कोणताही दिवा जळत नसेल तर कोणत्याही स्थितीत एटीएम वापरू नका.