थायलंड : आगीत 40 जणांचा मृत्यू


05/08/2022 14:14:09 PM   Sweta Mitra         10


थायलंडमधील नाईट क्लबमध्ये गुरुवारी भीषण आग लागली. आगीत 40 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीररीत्या भाजले.
चोनुबारी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात नाईट क्लबला आग लागल्याची घटना घडली. हे थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागात आहे. पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास माउंटन बी नाईट क्लबमध्ये आग लागली. मृतांमध्ये सहभागी असलेले सर्वजण थायलंडचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉक पोस्टने मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सावंग रोजनाथमस्‍थान फाऊंडेशनचा हवाला देत वृत्त दिले आहे की, आगीत होरपळून 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              fire night club Sattahip district Chonubari Bangkok Thailand