बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख आज (5 ऑगस्ट) वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय आणि दिलखेच अदांमुळे जेनेलिया डिसूझा चाहत्यांचा हृदयावर राज्य करते. तिने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेता रितेश देशमुखसोबत प्रेमविवाह केला. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या टेस्ट शूटसाठी रितेश हैदराबादला पोहोचला होता, या ठिकाणी पहिल्यांदा जेनेलिया आणि रितेश ची भेट झाली होती. सुरुवातीला जेनेलिया हिला रितेश आवडत नव्हता. रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने तो गर्विष्ठ असल्याचा तिचा समज होता. म्यान रितेश स्वतः पुढे जाऊन जेनेलियाशी हस्तांदोलन केले. मात्र मग घेदोही चांगले मित्र बनले. घेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.रितेश आणि जेनेलिया यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यानंतर देखील त्यांनी जवळपास 9 वर्षे आपलं प्रेम जगापासून लपवून ठेवल होतं. कोअखेर 3 फेब्रुवारी 2012 रोजी जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने झाले आहे. दोघांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव रायन आणि लहान मुलाचे नाव राहिल आहे. सध्या दोघेही अनेकदा मुलांसोबत मस्ती करताना दिसतात.