महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा


05/08/2022 14:25:33 PM   Sweta Mitra         0


दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होऊ लागला आहे. पावसाचा हा टप्पा एक आठवडय़ाहून अधिक काळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्वच भागात या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या मोसमी पावसाला सक्रिय होण्यासाठी पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार पुढील आठवडाभर राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत ५ किंवा ६ ऑगस्टपासून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे परिसरातही जोरदार सरींचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी भागांतही प्रामुख्याने घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              monsoon rains Meteorological Department rainfall South Konkan Western Maharashtra.