सुधीरने जिंकले सुवर्णपदक


05/08/2022 14:28:07 PM   Sweta Mitra         0पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मोठी कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण 6 सुवर्णपदके झाली आहेत. सुधीरने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 134.5 च्या विक्रमी स्कोअरसह 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला मात्र शेवटच्या प्रयत्नात 217 किलो वजन उचलण्यात अपयश आले.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Para powerlifter Sudhir Commonwealth Games gold medal India