काजोलचा वाढदिवस


05/08/2022 14:49:57 PM   Sweta Mitra         0
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल आज (5 ऑगस्ट) तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. 1974मध्ये जन्मलेली काजोल ही एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने या इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मुळातच चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
काजोलचे वडील सोमू मुखर्जी दिग्दर्शक होते, तर आई तनुजा अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच काजोलचा कल चित्रपटांकडे वाढला. 1992मध्ये तिने ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत शूटिंग करेन आणि नंतर शाळेत पुन्हा परतेन, असा निर्धार करून तिने चित्रपट स्वीकारला. मात्र, या चित्रपटानंतर तिने शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ करिअर करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर काजोलने अनेक हिट चित्रपट दिले.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Actress Kajol Bollywood actress entertainment