सुरेश वाडकर यांचा वाढदिवस


07/08/2022 18:59:20 PM   Sweta Mitra         44


अशी अनेक गाणी असतात, जी ऐकल्यानंतर त्यातील आवाज हा आपल्या मनात अगदी घर करून राहतो. अशाच काही अवाजांपैकी एक आहे  सुरेश वाडकर  यांचा आवाज… चित्रपटातील रोमँटिक गाणी असो वा देवाच्या दारी तल्लीन होण्यासाठीचं भजन, प्रत्येक प्रकारच्या गाण्यात सुरेश वाडकर यांचा आवाज चपखल बसतो. आज (7 ऑगस्ट) सुरेश वाडकर आपला 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. सुरेश वाडकर एक अप्रतिम गायक आहेत. त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी आणि कोकणी भाषांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ते शास्त्रीय संगीतात देखील कार्यरत आहेत. 1982 च्या ‘प्रेम रोग’ चित्रपटात, सुरेश वाडकर यांनी सहा पैकी चार गाणी गायली होती. ज्यात ‘भवरें ने खिलाया फूल’, ‘में हूं प्रेमरोगी’, ‘मेरी किस्मत मैं तू नहीं शायद’ आणि ‘मोहब्बत है क्या चीज’ या गाण्यांचा समावेश होता. सर्वांनाच ही गाणी खूप आवडली होती.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Suresh Wadkar voice romantic song bhajan singer indi Marathi Bhojpuri Konkani Prem Rog