हृतिकवर भावना दुखावल्याचा आरोप


21/08/2022 17:57:56 PM   Sweta Mitra         13


बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या एका नव्या जाहिरातीनं चांगलाच वादात सापडला आहे. ही जाहिरात झोमॅटो कंपनीची आहे,जी ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या व्यवसायातलं मोठं नाव आहे. हृतिक त्या जाहिरातीत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदीराचा उल्लेख करताना दिसत आहे. ज्यावरनं आता वाद छेडला गेला आहे. हृतिकवर या नव्या जाहीरातीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लागला आहे. 
झोमॅटोच्या जाहिरातीत हृतिक कितीतरी छोट्या-मोठ्या शहरांची नाव घेताना दिसत आहे. यातीलच एकात तो उज्जैनचा देखील उल्लेख करतो. ज्यामध्ये हृतिक फूड डिलीव्हरी बॉयकडून खाण्याचं पॅकेट स्विकारल्यानंतर बोलतो,''थाली खायचं मन केलं, उज्जैनमध्ये आहे, तर महाकालकडून मागून घेतलं''. हृतिकच्या याच जाहिरातीवरनं आता गोंधळ सुरू झाला आहे. मंदीरातील पुजाऱ्यांनी याचा विरोध करायला सुरुवात केली आहे. श्रद्धाळू लोक यामुळे हैराण तर झालेच आहेत पण नाराज देखील झाले आहेत.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              entertainment bollywood bollywood news hrittick roshan zomato