विराट अनुष्काची स्कुटी राईड


21/08/2022 18:02:05 PM   Sweta Mitra         9


टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईतील मड आयलंडमध्ये स्कूटी चालवताना दिसला आहे. शनिवारी विराट कोहली मड आयलंडमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंगनंतर पत्नी अनुष्का शर्मासोबत स्कूटी चालवताना दिसला. विरुष्काने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करत स्कुटी राईडचा मनसोक्त आनंद लुटला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काळे हेल्मेट घातले आहे. कोहली स्कूटर चालवत असताना अनुष्का शर्मा त्याच्या मागे बसली आहे. अनुष्का पूर्णपणे ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, किंग कोहलीने पांढऱ्या स्नीकर्ससह हिरवा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              virat kohli anushka sharma bollywood mumbai mumbai road maharashtra bike scooty ride