केसांची काळजी घेण्याच्या टिप्स


27/08/2022 19:17:50 PM   Sweta Mitra         24


केस मजबूत आणि लांब करण्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला केसांची काळजी घेण्याची योग्य पद्धत माहित असेल तर तुमचे केस सहजपणे लांब-जाड-मजबूत होऊ शकतात. चला तर मग आम्ही तुम्हाला केसांची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.
केसांची काळजी घेण्याचे उपाय


– डोक्यावर तेल लावून आपल्या बोटांनी हळुवार मालिश करावी. मालिश केल्यामुळं डोक्याच्या त्वचेचं रक्ताभिसरण सुरळीत होतं. डोक्याची मालिश साधारण 10 ते 15 मिनिटे करावी. हाताच्या तळव्याने डोकं रगडू नये. त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.
– केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या वाफाळता टॉवेल दोन ते तीन मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा. यामुळं तेल डोक्यात व्यवस्थित मुरते. असं करताना टॉवेलचं तापमान मध्यम ठेवा. खूप जास्त गरम टॉवेलमुळं केसांना इजा होऊ शकते.
– केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क आणि रखरखीत होतात. तसेच केस गळायला सुरवात होते.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              hair hair fall hair care hair tips medicine