लसिथ मलिंगाचा वाढदिवस


28/08/2022 18:39:18 PM   Sweta Mitra         18


श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा आज 28 ऑगस्ट रोजी 40 वा वाढदिवस. मलिंगाचा जन्म २८ ऑगस्ट १९८३ रोजी श्रीलंकेतील गाॅल येथे झाला. मलिंगाने क्रिकेट खेळायला वयाच्या ११व्या वर्षी सुरुवात केली. तो गाॅलजवळ असलेल्या रथगामा येथे त्याने क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. तो आधी टेनिस बाॅलने क्रिकेट खेळायचा परंतु नंतर त्याने लेदरचेंडूने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या १७व्या वर्षी मलिंगाने गाॅलवर आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटला प्रारंभ केला. त्याने श्रीलंकेकडून ३० कसोटी सामन्यात १०१ विकेट्स, २२६ वनडेत ३३८ विकेट्स तर ८४ टी२०मध्ये १०७ विकेट्स अशा एकुण ५४६ विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाने ७ फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ वेळा बाद केले आहे. त्यात सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, शाहिद आफ्रिदी, शेन वाॅटसन यांचा समावेश आहे. वनडेत तीन हॅट्रिक घेणारा मलिंगा जगातील एकमेव गोलंदाज आहे. त्यातील दोन हॅट्रिक ह्या त्याने विश्वचषकात घेतल्या आहेत. २००७ विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या होत्या. २०११विश्वचषकात त्याने केनियाविरुद्ध कोलंबोला पुन्हा हॅट्रिक घेतली होती. तर त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने तिसरी हॅट्रिक साजरी केली.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              lasith malinga birthday sports sports news srilanka baller