थँकयू सेरेना विलियम्स


03/09/2022 19:41:09 PM   Sweta Mitra         12


टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्ससाठी सोशल मीडियावर 'थँक्यू सेरेना' संदेश येत आहेत. टेनिस प्रेमींव्यतिरिक्त, क्रीडा आणि कला क्षेत्रातील बड्या व्यक्ती देखील सेरेनासाठी खास पोस्ट करत आहेत. कारण यूएस ओपन 2022 मधील सेरेना विल्यम्सचा आजचा सामना तिच्या कारकिर्दीतील निरोपाचा सामना मानला जात आहे.
अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सला यूएस ओपन 2022 च्या तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलिजनोविकने तिचा 7-5, 6-7(4), 6-१ 1सा पराभव केला. या पराभवानंतर ती यूएस ओपनमधून तसेच टेनिस कोर्टमधून कायमची बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सेरेनाने टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. या सामन्यानंतर सेरेनाने ज्या पद्धतीने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आणि कुटुंबाची आठवण काढली, त्यामुळे सेरेनाची निवृत्तीही निश्चित मानली जात आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              tennis tennis player serina wlliams retired match