पुन्हा भेटणार भारत पाक


04/09/2022 19:10:21 PM   Sweta Mitra         11
आशिया चषक 2022 च्या सुपर4 टप्प्यात भारत पाकिस्तान  आज पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहे. या दोन्ही बाजूंमधील पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला ज्यामध्ये भारताने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा अंतिम षटकांच्या थ्रिलरमध्ये 5 गडी राखून पराभव केला. त्यानंतर साखळी टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा पराभव करून अ गटातून सुपर 4 टप्प्यासाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव करून सुपर 4 साठी पात्र ठरले. आता सुपर 4 टप्प्यातील दोन संघ म्हणजे भारत आणि पाकिस्तान आज एकमेकांविरुध्द भिडणार आहे.  आजच्या सामना कोण जिंकणार याकडे फक्त भारत पाकिस्तानचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी द्यायची की रिषभ पंतच्या रुपाने अतिरिक्त फलंदाज खेळवायचा याचा फैसला संघ व्यवस्थापनाला करायचा आहे. तरी आजच्या टीम इंडियाच्या संघात कोणकोणते खेळाडू खेळतील आणि आज भारत पाकिस्तान विरुध्दचा सामना जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              india pakistan ind pak match 2022 asia cup asia cup 2022