अक्षय कुमारचा वाढदिवस


09/09/2022 20:00:02 PM   Sweta Mitra         19


बॉलिवूडचा 'खिलाड़ी' कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस. अक्षयने आता ५५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. १९९१ साली सौंगद या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. आज अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता ठरला आहे. 
बॉलिवूडच्या या प्रवासात अक्षयचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतु त्याने 2001 मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. दोघांनी जुल्मी आणि इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटात एकत्र काम केले होते. अक्षयचे ट्विंकलवर प्रेम होते आणि जेव्हा त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा ट्विंकलने दोन चार्ट तयार केले होते. याबाबत करण जोहरच्या शोमध्ये ट्विंकलने स्वतः खुलासा करत आपण अक्षयशी लग्न करण्यापूर्वी दोन चार्ट तयार केले होते अशी माहिती दिली. पहिल्या चार्टमध्ये तिने अक्षयशी लग्न करण्याचे फायदे आणि तोटे लिहिले, तर दुसऱ्यामध्ये अक्षयच्या निरोगी आयुष्याबद्दल लिहिले होते.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              bollywood bollywood actor akshay kumar birthday birthday boy