अभिनेता प्रभासवर दुःखाचा डोंगर


11/09/2022 19:14:06 PM   Sweta Mitra         10


दक्षिण चित्रपटसृष्टीतील 'बागी' स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले उप्पलापती कृष्णम राजू यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी हैदराबादमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 'बाहुबली' स्टार प्रभासचे काका होते. त्यांच्या अचानक जाण्याने दक्षिणेतील सिने विश्वात शोककळा पसरली आहे. कृष्णम राजू यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. कृष्णम राजू यांचा जन्म 20 जानेवारी 1940 रोजी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलाथूर येथे झाला. त्यांनी आपल्या सिने करिअरमध्ये जवळपास 187 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'चिलाका गोरिंका' या चित्रपटाद्वारे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. कृष्णम राजू यांना पदार्पणात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नंदी पुरस्कार मिळाला. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांना 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 3 राज्य नंदी पुरस्कार त्यांना आपल्या नावावर केले. सिनेविश्वात नाव कमावल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. 1991 मध्ये त्यांनी नरसापूरममधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. एवढंच नाही तर, त्यांनी 2004 पर्यंत वाजपेयी मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले होते.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actor actor death hydrabad tamil tamil actor bagi star krishnam raju