17/09/2022 19:18:38 PM Sweta Mitra 53
रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर कोणत्याही व्हायरस अथवा बॅक्टेरिया शरीरावर लगेच आक्रमण करू शकत नाही, आपल्यातील प्रतिकार क्षमता त्यास विरोध करते. यामुळे कोणत्याही रोगापासून दूर रहायचं असेल तर सर्वांनी स्वतःची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजे.
- आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, ऍन्टी-ऑक्सिडेंट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो.
- सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.