राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर


18/09/2022 18:49:05 PM   Sweta Mitra         9










आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी पक्षबांधणी तसेच निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय नेते आपापले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी बातचित करत करत असून या निवडणुकांसाठी योजना आखत आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील कंबर कसली असून ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर, अमरावतीतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करतील. आजपासून (१८ सप्टेंबर) त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून सध्या ते नागपूरमध्ये आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे सध्या नागपूरमध्ये पोहोचले आहेत. येथे ते दिवसभर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काल (१७ सप्टेंबर) ते विदर्भ एक्स्प्रेस रेल्वेने नागपूरसाठी रवाना झाले होते. सकाळी आठ वाजता ते नागपूमध्ये पोहोचले आहेत.






also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              mns shivsena shivsena leader mns leader raj thackerey