एसटी चालकाला बेदम मारहाण


18/09/2022 18:52:12 PM   Sweta Mitra         11


ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ वादातून दोन बाईकस्वारांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली आहे. पेण तालुक्यातील रामवाडी इथं ही घटना घडली आहे. हे दोन तरूण एसटी चालकाला मारहाण करतानाचा व्हीडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलाय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पनवेल-अलिबाग ही गाडी घेऊन एसटी ड्रायव्हर स्वप्निल भगत निघाला होता. गाडी पेण रामवाडीला पोहचली. मात्र रामवाडीजवळ ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. बाईकरवरील 2 तरुण आणि एसटी चालकामध्ये ओव्हरटेक करण्याच्या मुद्द्यावरुन चांगलीच जुंपली. वाद वाढतोय पाहून एसटी वाहकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या 2 तरूणांनी त्यालाही ढकलून दिलं. यानंतर या तरुणांनी एसटी चालकाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या तरुणांनी केलेल्या मारहाणीत चालकाचं रक्त निघालं. सुदैवाने चालकाचा डोळा वाचला. दरम्यान यानंतर एसटी चालकाला स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या 2 दोन तरूणांना ताब्यात घेतलंय.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              ST ST BUS BUS DRIVER MAHARASHTRA MUMBAI