राज ठाकरे विदर्भात


18/09/2022 18:53:54 PM   Sweta Mitra         7


राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेची ताकद वाढवण्यासाठी ते आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. मुंबई ते नागपूर असा रेल्वे प्रवास करत ते नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूरसह विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना राज ठाकरे भेट देणार आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवस ते विदर्भात तळ ठोकणार आहेत. यादरम्यान ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पक्ष संघटना बळकटीसाठी चर्चा करणार आहेत. त्यानंतर उद्या ते नागपुरात जाहीर पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर याच दिवशी ते चंद्रपूरसाठी रवाना होणार आहे. चंद्रपूर, अमरावती, बुलडाणा, वर्धा, असा दौरा करुन ते पुन्हा अमरावतीत येणार आहे. अमरावतीत राज ठाकरे पुन्हा पत्रकारांशी संवाद साधतील. राज ठाकरे १९ सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असून येथील पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. यानंतर २० सप्टेंबरला ते चंद्रपूर येथे मुक्काम करणार आहेत. तर २१ आणि २२ सप्टेंबरला ते अमरावती येथे आढावा बैठका घेणार आहेत. त्यानंतर २३ तारखेला ते मुंबईत परततील.
#

also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              NAGPUR mns shivsena shivsena leader mns leader raj thackerey