रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका


19/09/2022 20:09:52 PM   Sweta Mitra         8


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे  यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर दिलं जात आहे. दापोलीमध्ये शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम  यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? अशी विचारणा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली.
“बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन पुढे चाल, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत असं ते सांगत असतील. पण आमचे उद्धव ठाकरे  राष्ट्रवादीची भांडी घासतायत? आणि त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत आहे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              shivsena state india uddhav thackerey ramdas kadmanchi minister state minister eknath shinde