ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल


19/09/2022 20:18:15 PM   Sweta Mitra         4


राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. आज या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ५१ ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंच अशा दोन्हीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडणार आहे. यावेळी थेट पहिल्यांदाच नागरिकांमधून सरपंचाची निवड जाहीर होणार असून सकाळी १० पर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणत्या विचारांच्या गटाल यश मिळेल, ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता येईल, हे आज स्पष्ट होणार आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              GRAM PANCHAYAT MAHARASHTRA MARATHI MUMBAI POLL ELECTION