युवराजच्या वादळाची 15 वर्षे


19/09/2022 20:21:23 PM   Sweta Mitra         15


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 19 सप्टेंबर हा दिवस खास आहे. याच दिवशी तब्बल 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 19 सप्टेंबर 2007 साली युवराज सिंग याने एका षटकात सहा षटकार मारले होते. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवारजने हा पराक्रम केला. स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेल्या या षटकात युवराजने सलग सहा षटकार मारले आणि संघाला विजय देखील मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हर्शल गिब्स याच्यानंतर युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला होता. 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषकाचा पहिलाच हंगाम खेळला जात होता. हंगामातील 21 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. सामन्यातील 18 व्या षटकात एंड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता आणि त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या युवारजसोबत त्यांचा वाद झाला. वाद जरी फ्लिंटॉफसोबत झाला असला, तरी त्याचे परिणाम स्टुअर्ट ब्रॉड याला भोगावे लागले. भारताच्या डावातील 19 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या ब्रॉडला युवाराचने चांदणे दाखवले. या षटकातील सर्वच्या सर्व चेंडू युवराजने सीमारेषेपार पाठवले आणि खास विक्रम देखील केला.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              YUVRAJ YUVI YUVRAJ SINGH CRICKET MATCH CRICKET CRICKET NEWS