राज ठाकरेंचा हल्लाबोल


19/09/2022 20:22:32 PM   Sweta Mitra         10


गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी झाल्या होत्या. या सर्वामध्ये भाजप आणि मनसे युती होणार अशा चर्चांनादेखील उधाण आले होते. सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याची सुरूवात भाजपचा बालेकिल्ला नागपूरमधून झाली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या युतीबद्दल मोठं विधान केले आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन वादावरून हल्लाबोल केला आहे. वेदांता-फॉक्सकॉनवादावरून मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच ही चर्चा नेमकी कुठं फिस्ककटी हे सत्य बाहेर येण्यासाठी या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का? याचीही चौकशी व्हावी असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले. मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असंही ते म्हणाले.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              RAJ RAJ THACKWEREY MNS MAHARASHTRA MUMBAI MAHARASHTRA POLITICS