ग्रामपंचायत निकालीचा धुराळा


19/09/2022 20:24:14 PM   Sweta Mitra         4










राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडत असून १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज लागणार आहेत. एकूण ६०८ ग्रामपंचायतीपैकी ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल पार पडलेल्या मतदानासाठी ६७ टक्के मतदारांना मतदानाचा हक्क पार पाडला आहे. तसेच आज मतमोजणी पार पडत असून गुलाल उधळला जाणार आहे. आत्तापर्यंत २६२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप १०१, शिंदे गट २४, शिवसेना १४, कॉंग्रेस २२, राष्ट्रवादी ५८ आणि अपक्षासहित अन्य पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले आहेत. धुळ्यात भाजपने ३३ पैकी ३२ ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. आंबेगावनंतर जुन्नर तालुक्यातही राष्ट्रवादीने आपला गुलाल उधळला असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने तब्बल २९ जागांवर विजय मिळवला आहे. जळगाव येथील चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गट आघाडीवर असून प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना २ तर तीन ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे चोपडा तालुक्यात भाजपला एकाही जागेवर विजय मिळवला आला नाही. बुलढाण्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला असून महाविकास आघाडी १, भाजपा १ आणि ५ जागांवर स्थानिक आघाडीने विजय मिळवला आहे.






also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              shivsena GRAM PANCHAYAT MAHARASHTRA MARATHI MUMBAI POLL ELECTION